अंजुणे धरण फुल्ल, पाणी सोडण्यास प्रारंभ
डिचोली : केरी-सत्तरीतील अंजुणे धरणाची पातळी 90 मीटर पार झाली असून धरणातील अतिरिक्त पाणी समोरील नदीत सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. काल मंगळवार दि. 16 जुलै रोजी सकाळी धरणाचे चारही दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. सध्या धरणाची पातळी 90.75 मीटर इतकी आहे. धरणाची एकूण पातळी 93.2 मीटर आहे. वाळवंटी नदीला भरती, ओहोटी व पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्यात येत आहे. सध्या 5 सेंटीमीटर दरवाजे खोलण्यात आले आहेत. या धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना जलस्रोत खात्यातर्फे नोटीस जारी करून देण्यात आली आहे.
त्यानुसार पर्ये, मोर्ले, केरी, सांखळीतील लोकांना सतर्क करण्यात आले होते.गेल्यावर्षी 27 जुलै रोजी धरणाने 90 मीटरची पातळी ओलांडली होती. त्यामुळे त्याचदिवशी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी 11 दिवस अगोदरच धरणाने 90 मीटरची पातळी ओलांडली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा मारा सुरूच आहे. भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन अतिरिक्त पाणी सोडण्यात येते व धरणाची पातळी संतुलितपणे राखली जाते, असे धरणाचे साहाय्यक अभियंता दिलीप गावकर यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी अंजुणे धरण फुल्ल, पाणी सोडण्यास प्रारंभ
अंजुणे धरण फुल्ल, पाणी सोडण्यास प्रारंभ
डिचोली : केरी-सत्तरीतील अंजुणे धरणाची पातळी 90 मीटर पार झाली असून धरणातील अतिरिक्त पाणी समोरील नदीत सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. काल मंगळवार दि. 16 जुलै रोजी सकाळी धरणाचे चारही दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. सध्या धरणाची पातळी 90.75 मीटर इतकी आहे. धरणाची एकूण पातळी 93.2 मीटर आहे. वाळवंटी नदीला भरती, ओहोटी व पावसाचा […]