अंजली राठी प्रमुख ड्रॉमध्ये

वृत्तसंस्था/ नागपूर नागपूर महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंजली राठीने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविताना जपानच्या ओझेकीचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील ही स्पर्धा असून महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरीता पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत. मंगळवारी पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात अंजली राठीने ओझेकीचा 6-3, 6-2 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला. 18 वर्षीय अंजली राठीची […]

अंजली राठी प्रमुख ड्रॉमध्ये

वृत्तसंस्था/ नागपूर
नागपूर महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंजली राठीने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविताना जपानच्या ओझेकीचा पराभव केला.
डब्ल्यूटीए टूरवरील ही स्पर्धा असून महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरीता पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत. मंगळवारी पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात अंजली राठीने ओझेकीचा 6-3, 6-2 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला. 18 वर्षीय अंजली राठीची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आहे. आता या स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अंजली राठीची गाठ दक्षिण कोरियाच्या देयॉन बॅकशी होणार आहे.