अंजली निंबाळकर यांची खानापुरात पदयात्रा

खानापूर : 75 वर्षांच्या इतिहासात खानापूर तालुक्याला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसने माझी उमेदवारी जाहीर करून खानापूर तालुक्याला दिली आहे. यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांनी पक्षीय विचार न करता माझ्या पाठीशी राहून प्रचंड मतांनी विजयी करावे आणि खानापूर तालुक्याच्या विकासाची संधी द्यावी, असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी केले. खानापूर शहरातील प्रचारफेरीच्या […]

अंजली निंबाळकर यांची खानापुरात पदयात्रा

खानापूर : 75 वर्षांच्या इतिहासात खानापूर तालुक्याला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसने माझी उमेदवारी जाहीर करून खानापूर तालुक्याला दिली आहे. यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांनी पक्षीय विचार न करता माझ्या पाठीशी राहून प्रचंड मतांनी विजयी करावे आणि खानापूर तालुक्याच्या विकासाची संधी द्यावी, असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी केले. खानापूर शहरातील प्रचारफेरीच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी बेळगाव येथील रामकृष्ण परमहंस मठाचे मोहन महाराज उपस्थित होते. राजा छत्रपती स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शहरातील स्टेशन रोड, लक्ष्मी मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ या रस्त्यावरून पदयात्रा करत रवळनाथ मंदिर येथे सांगता करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले हेते. यावेळी माजी नगराध्यक्ष नारायण मयेकर, महादेव घाडी, अॅड. ईश्वर घाडी, यशवंत बिर्जे, चंबाण्णा होसमणी, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अलोक वागळे, गु•t टेकडी, विनायक मुतगेकर यांसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरात अंजली निंबाळकर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.