अंजली निंबाळकर यांना तालुक्यातून आघाडी मिळणार

खानापूर : काँग्रेसच्या कारवार मतदार संघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांची कर्मभूमी खानापूर तालुक्यातून लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून प्रचंड माताधिक्य मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या सर्व क्षेत्रातून अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर होत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच आशादायक आहे. असे मत गर्लगुंजी ग्रा. पं. चे सदस्य […]

अंजली निंबाळकर यांना तालुक्यातून आघाडी मिळणार

खानापूर : काँग्रेसच्या कारवार मतदार संघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांची कर्मभूमी खानापूर तालुक्यातून लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून प्रचंड माताधिक्य मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या सर्व क्षेत्रातून अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर होत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच आशादायक आहे. असे मत गर्लगुंजी ग्रा. पं. चे सदस्य आणि काँग्रेसचे कार्यकर्तें प्रसाद पाटील यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने इतिहासात पहिल्यांदाचा खानापूरला उमेदवारी दिल्याने खानापूर तालुक्यात विकासाचे मोठे दालन उघडले आहे. अंजली निंबाळकर या आमदार असताना तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करून अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. लोकसभेचे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना सतत सहावेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र गेल्या तीस वर्षात विकासासाठी काहीही केलेले नाही. ते आता जगजाहीर झाले आहे. भाजपला तालुक्यातील विकासाचा मुद्दाच नसल्याने त्यांनी प्रचाराची दिशाच बदललेली आहे.
निंबाळकर यांना सर्व स्थरातून पाठिंबा
खानापूर तालुक्याच्या मताधिक्यावर भाजप कायम निवडणुकीत आघाडी घेत होते. मात्र यावेळी खानापूर तालुक्यालाच उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मराठी भाषिकांतून याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असून, निंबाळकर यांना सर्व स्थरातून पाठिंबा जाहीर होत आहे. त्यामुळे अंजली निंबाळकर यांना तालुक्यातून मताधिक्य मिळणार हे आता स्पष्ट झाले असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे दिसून येत आहे.