धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू ,अंजली दमानियाच्या ट्विटने खळबळ
धनंजय मुंडे यांचे जवळचे आणि वेंकटेश्वरा इंड्रस्टीयल सर्व्हिसचे डायरेक्टर राजेंद्र घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचा पुण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या मृत्यू नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.
ALSO READ: नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
त्यांनी ट्विटमध्ये मनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘त्यांनी मनाली यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवत असल्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. तसेच मनाली यांचा मृत्यू कोणत्याही कारणाशिवाय झाला असून त्यांनी प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
ALSO READ: औरंगाबादनंतर नागपूर खंडपीठला मिळाली धमकी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
खूप खूप धक्कादायक !
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.
पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते.
राजे घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने… pic.twitter.com/m7LmqE35wD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 21, 2025
या पूर्वी देखील अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 11 शेतकऱ्यांचा छळ करून त्यांच्या 20 कोटींची रकम असलेल्या जमिनी केवळ 8 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: शिवसेना यूबीटी खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संतप्त