टिळक चौक परिसरात अंगणवाडी आहाराचा साठा जप्त
दुकानाच्या जिन्याखालून 18 पोती हस्तगत
प्रतिनिधी/ बेळगाव
अंगणवाडी बालकांसाठीच्या पोषण आहाराचा साठा टिळक चौक परिसरात अधिकाऱ्यांनी जप्त केला. अंगणवाडी इमारतीऐवजी टिळक चौक परिसरातील एका दुकानाच्या जिन्यावर हा साठा साठविण्यात आला होता.
पोषण आहाराची पोती टिळक चौक परिसरात साठविण्यात आल्याची माहिती मिळताच बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी टिळक चौक परिसरात धाव घेतली. एका दुकानाच्या जिन्यावर पाहणी केली असता 18 पोती पोषण आहाराचा साठा आढळून आला.
बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही टिळक चौक परिसरात धाव घेतली. कोणत्या उद्देशाने हा साठा साठविण्यात आला होता, याची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी एफआयआरही दाखल करण्यात येणार असल्याचे आर. नागराज यांनी सांगितले. यासंबंधी शनिवारी रात्री खडेबाजार पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी टिळक चौक परिसरात अंगणवाडी आहाराचा साठा जप्त
टिळक चौक परिसरात अंगणवाडी आहाराचा साठा जप्त
दुकानाच्या जिन्याखालून 18 पोती हस्तगत प्रतिनिधी/ बेळगाव अंगणवाडी बालकांसाठीच्या पोषण आहाराचा साठा टिळक चौक परिसरात अधिकाऱ्यांनी जप्त केला. अंगणवाडी इमारतीऐवजी टिळक चौक परिसरातील एका दुकानाच्या जिन्यावर हा साठा साठविण्यात आला होता. पोषण आहाराची पोती टिळक चौक परिसरात साठविण्यात आल्याची माहिती मिळताच बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी टिळक चौक परिसरात धाव घेतली. एका दुकानाच्या जिन्यावर पाहणी केली […]