अँडी मरेचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
एटीपी टूरवरील येथे सुरु झालेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा सामना वादळी पावसाळी वातावरणामुळे अर्धवट स्थितीत थांबवावा लागला होता. पण नंतर त्याला हान्फमनकडून पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेत ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोविच यांना शेवटच्या क्षणी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
अँडी मरे आणि बिगर मानांकित हान्फमन यांच्यातील पहिल्या फेरीतील सामना 7-5, 4-1 अशा स्थितीत पोहोचला असताना अचानक मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर हान्फमनने दुसरा सेट 6-2 असा घेत सामना जिंकला. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची क्लेकोर्टवरील सरावाची स्पर्धा आहे. जोकोविच आणि हान्फमन यांच्यात जिनिव्हा स्पर्धेत दुसऱ्या फेरीत गाठ पडणार आहे. मरेने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 3 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद तसेच 2012 व 2016 साली ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीतील सुवर्णपदके मिळविली आहेत.
Home महत्वाची बातमी अँडी मरेचे आव्हान समाप्त
अँडी मरेचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ जिनिव्हा एटीपी टूरवरील येथे सुरु झालेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा सामना वादळी पावसाळी वातावरणामुळे अर्धवट स्थितीत थांबवावा लागला होता. पण नंतर त्याला हान्फमनकडून पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेत ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोविच यांना शेवटच्या क्षणी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. अँडी मरे आणि […]