पनामात मिळाला सोन्याने भरलेला प्राचीन मकबरा
31 जणांचा देण्यात आला होता बळी
पनामाच्या एका पुरातत्व स्थळी सोन्याचा खजिना आणि बळी देण्यात आलेल्या लोकांच्या मकबऱ्याचा शोध लागला आहे. अनुमानानुसार हा मकबरा सुमारे 1200 वर्षे जुना असल्याचे पनामाच्या संस्कृती मंत्रालयाने सांगितले आहे. संबंधित क्षेत्रात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला दफन करण्यात आले असावे. अनेक लोकांसोबत हा व्यक्ती ‘मृत्यूनंतरच्या जीवना’त जाऊ इच्छित होता, याचमुळे मानवी बळी देण्यात आले असावेत, असे म्हटले गेले आहे. एन कानो पुरातत्व पार्कमधील मकबऱ्यात वैज्ञानिकांनी सोन्याचा खजिना शोधला आहे. यात कंकण, सोन्याचे बेल्ट, सोन्याने जडविलेले व्हेलचे दात आणि गोलाकार सोन्याच्या प्लेट्सचा समावेश आहे. पुरातत्व तज्ञांना एक पुरुष आणि महिलेच्या आकाराचे दागिने, बासरीचा सेट देखील मिळाला आहे. एल कॅनो फौंडेशनकडून मकबरा बहुधा स्थानिक कोकले संस्कृतीच्या एखाद्या विशेष व्यक्तीचा असावा, जो मृत्यूसंबंधी 30 वर्षे वयाचा राहिला असावा असे म्हटले गेले आहे. फौंडेशनकडून खजिन्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. फेंडेशनच्या संचालिका डॉ. जूलिया मेयो यांनी मकबऱ्यात संबंधित व्यक्तीसोबत 31 अन्य लोकांचे सांगाडे असून त्यांचा सेवा करण्यासाठी बळी देण्यात आला असावा, असे नमूद केले आहे.
अद्याप उत्खनन सुरू
या मकबऱ्याच्या स्थळाचे उत्खनन अद्याप पूर्ण झालेले नाही. याचमुळे मकबऱ्यात किती लोक होते हे पूर्णपणे सांगता येणार नाही. ज्या व्यक्तीला दफन करण्यात आले होते, त्याचे तोंड जमिनीच्या दिशेने होते. त्याखाली एक महिलेचा सांगाडा असल्यचे मेयो यांनी सांगितले आहे. पुरातत्व स्थळी उत्खनन 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते. मकबऱ्यात आढळून आलेले सोने आणि कलाकृतींचे आर्थिक मूल्यासोबत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य असल्याचे संस्कृती मंत्रालयातील वारसा विभागाचे राष्ट्रीय संचालक लिनेट मोंटेनेग्रो यांनी म्हटले.
Home महत्वाची बातमी पनामात मिळाला सोन्याने भरलेला प्राचीन मकबरा
पनामात मिळाला सोन्याने भरलेला प्राचीन मकबरा
31 जणांचा देण्यात आला होता बळी पनामाच्या एका पुरातत्व स्थळी सोन्याचा खजिना आणि बळी देण्यात आलेल्या लोकांच्या मकबऱ्याचा शोध लागला आहे. अनुमानानुसार हा मकबरा सुमारे 1200 वर्षे जुना असल्याचे पनामाच्या संस्कृती मंत्रालयाने सांगितले आहे. संबंधित क्षेत्रात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला दफन करण्यात आले असावे. अनेक लोकांसोबत हा व्यक्ती ‘मृत्यूनंतरच्या जीवना’त जाऊ इच्छित होता, याचमुळे मानवी बळी […]
