आनंद अकादमी, यु-निट वॉस्कोची विजयी सलामी
सुरेश गडकरी चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 2 ऱ्या सुरेश गडकरी 12 वर्षाखालील आंतर कॅम्प क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवसी यू-निट वास्कोने रॉजर स्पोर्ट्सचा तर आनंद अकादमीने यु निटचा पराभव करून विजयी सलामी दिली. पार्थ संकपाल व अद्वैत चव्हाण फांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. भगवान महावीर मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे सुरेश गडकरी, दर्श गडकरी, झमिर पटवेगार, अजय चव्हाण (गोवा) आनंद करडी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पुजन करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या सामन्यात रॉजर स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडीबाद 97 धावा केल्या. त्यात मयांक निर्मळकरने 14 तर रजत शंभूचेने 12 धावा केल्या. यु-निटतर्फे प्रणव पेडणेकर व काविश परब यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना यु-निट वास्कोने 14 षटकात 2 गडीबाद 100 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात पार्थ संकपालने 3 चौकारासह 20, कियाण तोटाने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. रॉजरतर्फे हजरत सामीने 1 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 1 गडीबाद 156 धावा केल्या. त्यात अद्वैत चव्हाणने 8 चौकारासह नाबाद 64, अर्थव करडीने 5 चौकारासह 48 धावा केल्या. यु-निट वॉस्कोतर्फे स्वप्नील एन. ने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना यु-निट वॉस्को संघाने 25 षटकात 5 गडीबाद 147 धावाच केल्या. त्यात कियान तोटाने 5 चौकारासह 59 तर कावेश परबने 7 चौकारासह नाबाद 52 धावा केल्या. आनंततर्फे अद्वैत चव्हाणने 1 गडीबाद केला.
Home महत्वाची बातमी आनंद अकादमी, यु-निट वॉस्कोची विजयी सलामी
आनंद अकादमी, यु-निट वॉस्कोची विजयी सलामी
सुरेश गडकरी चषक क्रिकेट स्पर्धा बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 2 ऱ्या सुरेश गडकरी 12 वर्षाखालील आंतर कॅम्प क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवसी यू-निट वास्कोने रॉजर स्पोर्ट्सचा तर आनंद अकादमीने यु निटचा पराभव करून विजयी सलामी दिली. पार्थ संकपाल व अद्वैत चव्हाण फांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. भगवान महावीर मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी […]