अनाहत सिंग स्क्वॅश स्पर्धेत विजेती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एडीनबर्ग येथे झालेल्या 2023 च्या स्कॉटीश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची अनाहत सिंग हिने मुलोच्या 19 वर्षाखालील वयोगटात जेथेपद पटकाविले.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात अनाहत सिंगने स्कॉटलंडच्या रॉबीन मॅकेलपिनचा 11-6, 11-1, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करत जेथेपद पटकाविले. दिल्लीच्या अनाहत सिंगने 19 वर्षाखालील आणि वरिष्ठांच्या राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत दुहेरी मुकूट मिळविला होता. तर तिने अशिया क्रीडा स्पर्धेत अभय सिंग समवेत मिश्र दुहेरीत कास्यपदक पटकाविले होते.
एडीनबर्कच्या या स्पर्धेत भारताच्या सुभाष चौधरीने मुलांच्या 15 वर्षाखालील गटात एकेरीचे जेथेपद मिळविताना भारताच्या शिवेन अगरवालचा 5-11, 11-4, 6-11, 11-8, 11-5 असा पराभव केला. तर 13 वर्षाखालील मुलांच्या गटातील जेतेपद भारताच्या श्रेष्ठ अय्यरने मिळविले. त्याने आपल्या देशाच्या एस. झा याचा 11-8, 11-8, 3-11, 11-8 असा पराभव केला. मुलींच्या 13 वर्षाखालील वयोगटात भारताच्या टॉप सिडेड आद्या बुधियाने जेतेपद मिळविताना मलेशियाच्या चेयुचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये 30 देशांचे सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते.
Home महत्वाची बातमी अनाहत सिंग स्क्वॅश स्पर्धेत विजेती
अनाहत सिंग स्क्वॅश स्पर्धेत विजेती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली एडीनबर्ग येथे झालेल्या 2023 च्या स्कॉटीश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची अनाहत सिंग हिने मुलोच्या 19 वर्षाखालील वयोगटात जेथेपद पटकाविले. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात अनाहत सिंगने स्कॉटलंडच्या रॉबीन मॅकेलपिनचा 11-6, 11-1, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करत जेथेपद पटकाविले. दिल्लीच्या अनाहत सिंगने 19 वर्षाखालील आणि वरिष्ठांच्या राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत दुहेरी […]