कला अकादमीला वाचविण्यासाठी राज्यभरातील कलाकारांचा पुढाकार

पणजीत झाली बैठक, चळवळ सुरु, कलाकारांना पत्र जारी पणजी : कला अकादमी प्रकरणी आता गोव्यातील कलाकार एकत्र येत असून कला अकादमी वाचविण्यासाठी सरकारला जोरदार दणका देण्याच्या स्थितीत ही मंडळी आहे. अलिकडेच कलाकारांची एक बैठक पणजीत झाली. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सर्वोच्च ठरलेल्या या संस्थेला भ्रष्टाचारात बुडविण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तसेच हे सारे रोखण्याचा निर्धार […]

कला अकादमीला वाचविण्यासाठी राज्यभरातील कलाकारांचा पुढाकार

पणजीत झाली बैठक, चळवळ सुरु, कलाकारांना पत्र जारी
पणजी : कला अकादमी प्रकरणी आता गोव्यातील कलाकार एकत्र येत असून कला अकादमी वाचविण्यासाठी सरकारला जोरदार दणका देण्याच्या स्थितीत ही मंडळी आहे. अलिकडेच कलाकारांची एक बैठक पणजीत झाली. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सर्वोच्च ठरलेल्या या संस्थेला भ्रष्टाचारात बुडविण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तसेच हे सारे रोखण्याचा निर्धार करुन त्यासाठी योजना आखण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष का?
या संपूर्ण प्रकल्पाचा दुऊपयोग कऊन या संस्थेचे अस्तित्व संपविणाऱ्या व्यक्तीला कला अकादमीवऊन हटविण्यासाठी गोव्यातील सर्व स्वाभिमानी कलाकारांना एकत्र आणण्याचे काम सुऊ झाले आहे. भाजपच्या प्रदेश समितीच्या पातळीवर अनेक पदाधिकारी व नेत्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कला अकादमीत लक्ष घालण्यास सांगितले होते. मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमीच्या अध्यक्षपदावऊन हटविण्यास सांगितले हेते, मात्र मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही.
कलाकारांना पाठविले पत्र
आता कलाकारांनीच पुढाकार घेतला असून कला अकादमी वाचविण्यासाठी त्यांनी सरकारवर जोरदार दबाव आणण्याचे ठरविले आहे. या संदर्भात काही कलाकारांनी एकमेकांना एक पत्र पाठविले आहे. हे पत्र मराठी, कोकणी, इंग्रजी व हिंदीमधून आहे. कला अकादमी हे गोमंतकाच्या संस्कृतीचे पीठ आहे. आपल्या डोळ्dयादेखत या प्रकल्पाची वाट लागतेय, ही संस्था संपविण्याचा जो प्रयत्न होतोय तो डोळे बंद ठेवून, मुके, बहिरे, आंधळे बनून गप्प राहायचे आहे का? असा सवाल कलाकारांनी विचारलेला आहे. आम्ही आज गप्प बसलो तर पुढील पिढ्या माफ करणार नाही. म्हणूनच या स्थितीला वाचा फोडण्यासाठी अथवा ही कोंडी सोडविण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उभारतोय. आपणाकडून सकारात्मक प्रतिसाद हवा,  असे त्या पत्रात म्हटलेले आहे. गोव्यात कला अकादमी वाचविण्यासाठी आता जोरदार मोहीम उघडली जातेय व तिचे चळवळीत ऊपांतर होणार आहे.