नायकाला 188 टक्क्यांचा वाढीव नफा

बेंगळूर :  ऑनलाइन फॅशन रिटेलर नायका कंपनीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 6.9 कोटी रुपये इतका निव्वळ प्राप्त केला आहे. वर्षाच्या मागे समान अवधीमध्ये कंपनीने 2.4 कोटी रुपये इतका निव्वळ नफा कमावला होता. त्या तुलनेमध्ये पाहता नफा जवळपास 188 टक्के अधिक आहे.  कंपनीने याच  तिमाहीत 1668 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे, जो मागच्या तुलनेमध्ये 28 टक्के […]

नायकाला 188 टक्क्यांचा वाढीव नफा

बेंगळूर : 
ऑनलाइन फॅशन रिटेलर नायका कंपनीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 6.9 कोटी रुपये इतका निव्वळ प्राप्त केला आहे. वर्षाच्या मागे समान अवधीमध्ये कंपनीने 2.4 कोटी रुपये इतका निव्वळ नफा कमावला होता. त्या तुलनेमध्ये पाहता नफा जवळपास 188 टक्के अधिक आहे.  कंपनीने याच  तिमाहीत 1668 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे, जो मागच्या तुलनेमध्ये 28 टक्के अधिक आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीच्या सौंदर्यप्रसाधन व्यवसायाने चांगली कामगिरी केली असल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या व्यवसाय विस्तारासाठी संचालक मंडळाने गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली असून आगामी काळामध्ये कंपनी याकरता 20 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे.