जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

शिरूर–जुन्नर हद्दीतील पारगाव मंगरूळ (ता. जुन्नर) येथे शेताच्या बांधावर बसलेल्या आठवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

शिरूर–जुन्नर हद्दीतील पारगाव मंगरूळ (ता. जुन्नर) येथे शेताच्या बांधावर बसलेल्या आठवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ALSO READ: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, उभारणार 550 कोटींचा लॉजिस्टिक पार्क

रोहित बाबू कापूर वय वर्ष 8 असे या मयत मुलाचे नाव आहे. रोहित आपल्या कुटुंबासह कांदाकाढणीच्या कामासाठी पारगाव मंगरूळ आला होता. शेतात मजूर काम करत होते आणि रोहित शेताच्या बांधावर बसला असताना उसाच्या शेतात दबा भरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि ओढत उसाच्या शेतात नेले.

ALSO READ: नगरपालिका निवडणुकांच्या घोषणेला शिवसेना उबाठाचा आक्षेप, निवडणूक आयोगाला लिहिले पत्र
तो  जोरजोरात ओरडू लागला. त्याचे ओरडणे ऐकून महिला मजुरांनी धावत जाऊन धाडस करत उसाच्या शेतात धाव घेत त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. बिबट्याच्या हल्ल्याने रोहित गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

ALSO READ: पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

या घटनेनन्तर रुग्णालयाच्या बाहेर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही असा निर्णय नागरिकांनी केला. या मुळे तिथे तणावाची स्थिती बनली. 
 

जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला. परिसरात तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Edited By – Priya Dixit

Go to Source