पर राज्यातील गाजर स्थानिक भासवून विकण्याचा प्रयत्न
झाडशहापूर येथील प्रकार : शेतकऱ्यांनी जाब विचारताच घेतला काढता पाय
वार्ताहर / किणये
पर राज्यातून गाजर पीक आणून झाडशापुरातील गाजर पीक असल्याचे भासवून एक व्यापारी विकण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू होता. यामुळे स्थानिक झाडशापूर गावातील गाजर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अखेर संतप्त झालेल्या झाडशापुरातील शेतकऱ्यांनी त्या व्यापारी शेतकऱ्याला सोमवारी चांगलाच जाब विचारला. आणि यापुढे इतर ठिकाणावून गाजर आणून झाडशापुरातील असल्याचे सांगून विक्री करू नये अशी ताकीदही त्यांना देण्यात आली आहे. झाडशापूर गावातील एक गाजर उत्पादक, व्यापारी नाशिक व अन्य ठिकाणाहून गाजर टेम्पोतून झाडशापुरला आणून ती बेळगाव येथील असल्याचे सांगून बेळगाव व अन्य ठिकाणच्या मार्केटला पाठवीत असे. यामुळे झाडशापूर परिसरातील गाजर पिकाला फटका बसला होता. पर राज्यातील गाजर पिकाचे ब्रँड स्थानिक गाजर पीक असल्याचे भासविण्याचा हा प्रकार सुरू होता. त्यामुळे गाजर उत्पादक शेतक्रयातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पुन्हा त्या व्यापाऱ्याने टेम्पोतून पर राज्यातील गाजर झाडशापूर येथे आणले होते. त्यावेळी गावातील शेतकरी एकत्र जमा झाले आणि त्या व्यापाऱ्याला जाब विचारला. तसेच अशा पद्धतीची विक्री करू नये स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करावा असेही सांगण्यात आले. झाडशापुरातील बहुतांशी शेतकरी गाजराचे पीक घेतात. या गाजराच्या पिकावरच अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे. सदर व्यापारी शेतकऱ्याने बाहेरील गाजर आणून झाडशापुरातील असल्याचे भासवून अन्य ठिकाणी त्याची विक्री सुरू केली होती. मात्र याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसू लागला होता.
अखेर गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.
बाहेरील गाजराचे पीक टेम्पोमधून झाडशापूर येथे आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी पी. सी. गोरल, कल्लाप्पा गोरल, मोनाप्पा सावंत, भरमाणा नंदिहळ्ळी, लक्ष्मण मयेकर, आनंद मयेकर, सोमांना मयेकर, देवाप्पा मयेकर आदींसह सुमारे शंभरहून अधिक शेतकरी उपस्थित होते
Home महत्वाची बातमी पर राज्यातील गाजर स्थानिक भासवून विकण्याचा प्रयत्न
पर राज्यातील गाजर स्थानिक भासवून विकण्याचा प्रयत्न
झाडशहापूर येथील प्रकार : शेतकऱ्यांनी जाब विचारताच घेतला काढता पाय वार्ताहर / किणये पर राज्यातून गाजर पीक आणून झाडशापुरातील गाजर पीक असल्याचे भासवून एक व्यापारी विकण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू होता. यामुळे स्थानिक झाडशापूर गावातील गाजर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अखेर संतप्त झालेल्या झाडशापुरातील शेतकऱ्यांनी त्या व्यापारी शेतकऱ्याला […]