झेरे गल्ली अनगोळ येथे जनावरांचा गोठा कोसळला

सतत हेणाऱ्या पावसाचा परिणाम बेळगाव : झेरे गल्ली, अनगोळ येथे जनावरांचा गोठा कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. गोठ्याची भिंत कोसळल्याने एका म्हशीला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु गोठा अर्धा कोसळल्यामुळे जनावरे नेमकी कोठे बांधायची, असा प्रश्न जाधव कुटुंबीयासमोर आहे. अशोक अर्जुन जाधव यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा झेरे गल्ली येथे आहे. सततच्या पावसामुळे मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास […]

झेरे गल्ली अनगोळ येथे जनावरांचा गोठा कोसळला

सतत हेणाऱ्या पावसाचा परिणाम
बेळगाव : झेरे गल्ली, अनगोळ येथे जनावरांचा गोठा कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. गोठ्याची भिंत कोसळल्याने एका म्हशीला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु गोठा अर्धा कोसळल्यामुळे जनावरे नेमकी कोठे बांधायची, असा प्रश्न जाधव कुटुंबीयासमोर आहे. अशोक अर्जुन जाधव यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा झेरे गल्ली येथे आहे. सततच्या पावसामुळे मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास मोठा आवाज होऊन गोठा कोसळला. गोठ्यामध्ये तीन ते चार जनावरे होती. यातील एका जनावराच्या अंगावर भिंतीचा काही भाग कोसळला. जनावरे बाहेर काढण्यात आली. परंतु सध्याच्या पावसामध्ये जनावरे कोठे बांधायची असा प्रश्न जाधव कुटुंबीयासमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने या कुटुंबीयाना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे