अमृतसरी फिश फ्राय रेसिपी

साहित्य- मासे – 500 ग्रॅम तुकडे केलेले व्हिनेगर – 1 ½ चमचा हळद- 1 ½ चमचा तिखट 1 ½ चमचा धणेपूड – 1 चमचा गरम मसाला – अर्धा चमचा

अमृतसरी फिश फ्राय रेसिपी

साहित्य- 

मासे – 500 ग्रॅम तुकडे केलेले 

व्हिनेगर – 1 ½ चमचा 

हळद- 1 ½ चमचा 

तिखट 1 ½  चमचा 

धणेपूड – 1 चमचा 

गरम मसाला – अर्धा चमचा 

आले-लसूण पेस्ट – 1 चमचा 

लिंबाचा रस – 1 चमचा 

तांदळाचे पीठ – 2 चमचे

कॉर्न फ्लोअर – 1 चमचा 

ताजी कोथिंबीर चिरलेली 

तेल 

चवीनुसार मीठ

 

कृती-

पंजाबी फिश फ्राय बनवण्यास सर्वात आधी माशांचे तुकडे करून ते चांगले धुवून घ्यावे. तसेच पुसून घ्यावे. आता माशांच्या तुकड्यांमध्ये हळद, मीठ, तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि आले-लसूण पेस्ट घालून मिक्स करावे. आता माशात लिंबाचा रस आणि व्हिनेगर घालावे आणि 15 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.तसेच आता एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोअर घ्यावे.  थोडेसे पाणी घालून आणि घट्ट पिठ तयार करावे. जेणेकरून माशांचे तुकडे चांगले मिक्स होतील. आता पॅनमध्ये तेल गरम करावे. तेल चांगले तापले की, आता मॅरीनेट केलेले माशाचे तुकडे पिठात बुडवून घेऊन गरम तेलात 4-5 मिनिटे ते दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. आता शिजल्यावर मासे तेलातून बाहेर काढावे. आता त्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची चटणी आणि काही कांदे घालावे. तर चला तयार आहे आपली अमृतसरी फिश फ्राय रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik