अमृतपाल सिंहच्या अडचणीत वाढ
संसद सदस्यत्वाला उच्च न्यायालयात आव्हान
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघात विजय मिळवून खासदार झालेला खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या संसद सदस्यत्वाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. खडूर साहिब येथून अपक्ष निवडणूक लढविणारे विक्रमजीत सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अमृतपाल सिंहवर माहिती लपविण्यासमवेत अन्य गंभीर आरोप केले आहेत. याचिकेवर उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होऊ शकते.
खडूरसाहिब येथून निवडणूक लढविणाऱ्या अमृतपालने स्वत:च्या उमेदवारी अर्जात महत्त्वपूर्ण माहिती लपविली आहे. त्याने स्वत:च्या निवडणूक खर्चाचाही पूर्ण तपशील दिलेला नाही. निवडणुकीदरम्यान त्याच्या समर्थनार्थ दररोज अनेक बैठका व्हायच्या आणि वाहन तसेच प्रचारसामग्रीचा वापर व्हायचा, याचाही तपशील देण्यात आलेला नाही. तसेच प्रचारासाठी करण्यात आलेला खर्च कुणी उचलला हे देखील जाहीर करण्यात आलेले नाही. अमृतपालला मिळालेल्या निधीविषयी कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर त्याचा प्रचार करण्यात आला, त्याचा खर्च कुणी केला याचीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करत विक्रमजीत सिंह यांनी संबंधित निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
तर आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद खडूर साहिबचा खासदार अमृतपाल सिंहने एनएसए अंतर्गत कोठडी वाढविण्याच्या पंजाब सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयात दाखल त्याच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अमृतपालने अपक्ष उमेदवार म्हणून पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्याने काँग्रेस उमेदवार कुलबीर सिंह जीरा यांना 1 लाख 97 हजार 120 मतांनी पराभूत केले होते.
Home महत्वाची बातमी अमृतपाल सिंहच्या अडचणीत वाढ
अमृतपाल सिंहच्या अडचणीत वाढ
संसद सदस्यत्वाला उच्च न्यायालयात आव्हान वृत्तसंस्था/ चंदीगड पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघात विजय मिळवून खासदार झालेला खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या संसद सदस्यत्वाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. खडूर साहिब येथून अपक्ष निवडणूक लढविणारे विक्रमजीत सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल […]