अमोल मिटकरी यांची घेतली सीमाभागातील युवकांनी भेट

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात कर्नाटक सरकारकडून अत्याचार व कन्नडसक्ती वाढली आहे. त्याचबरोबर दुकानांवर मराठी फलक दिसल्यास तोडफोड करण्याची भाषा कन्नड संघटनांकडून केली जात आहे. परंतु याकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे आमदार म्हणून आपण महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून कानडी जाच कमी करण्यास मदत करावी, अशी मागणी सीमाभागातील युवकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. […]

अमोल मिटकरी यांची घेतली सीमाभागातील युवकांनी भेट

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात कर्नाटक सरकारकडून अत्याचार व कन्नडसक्ती वाढली आहे. त्याचबरोबर दुकानांवर मराठी फलक दिसल्यास तोडफोड करण्याची भाषा कन्नड संघटनांकडून केली जात आहे. परंतु याकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे आमदार म्हणून आपण महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून कानडी जाच कमी करण्यास मदत करावी, अशी मागणी सीमाभागातील युवकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. समन्वय मंत्री चंद्रकांत दादा पाटील व शंभुराजे देसाई हे निष्क्रिय ठरत आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी माणसांसाठी हेल्पलाईन सुरू करावी. याद्वारे सीमावासियांना येणाऱ्या समस्या महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचतील. तसेच आपण लवकरच बेळगाव दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सुरज कणबरकर व इतर उपस्थित होते.