नक्षलवाद्यांविरोधात अमित शहा यांचा एक्शन प्लॅन, आठ राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
नक्षलग्रस्त राज्यांमध्ये शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसेच या यामध्ये आठ नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नक्षलग्रस्त राज्यांमध्ये शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार असून तसेच या यामध्ये आठ नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. ही बैठक दिल्लीत होणार असून त्यात झारखंड, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या बैठकीला वामपंथी अतिवादग्रस्त राज्यांना विकास सहाय्य देणारे मंत्रालयाचे पाच केंद्रीय मंत्रीही देखील हजर राहणार आहे.
Edited By- Dhanashri Naik