अमित शाह म्हणाले-तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मोदीजी दोन वर्षात नक्षलवाद संपुष्टात आणतील

गुजरात मधील 25 लोकसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यात 7 मे ला मतदान होईल. अमित शाह गांधीनगर मधून लोकसभा जागांसाठी भाजपचे उमेदवार आहे. जिथे ते दुसऱ्यांदा निवडणूक मैदानात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी …

अमित शाह म्हणाले-तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मोदीजी दोन वर्षात नक्षलवाद संपुष्टात आणतील

लोकसभा निवडणूक 2024 : गुजरात मधील 25 लोकसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यात 7 मे ला मतदान होईल. अमित शाह गांधीनगर मधून लोकसभा जागांसाठी भाजपचे उमेदवार आहे. जिथे ते दुसऱ्यांदा निवडणूक मैदानात आहे. 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यावेळेस जर सत्तेत आले तर दोन वर्षात भारतातुन नक्षलवाद पूण संपुष्टात आणतील. आमदाबाद मधील निवडणूक रॅलीला संबोधित करत अमित शाह यांनी परत मोदींना मत द्या असा आग्रह मतादातांना केला. यामुळे देशातील नक्षलवाद संपुष्टात येईल. ते म्हणाले की नक्षलवाद अजून छत्तीसगड पर्यंत सीमित आहे. 

 

भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह म्हणाले की, मागील पाच वर्षादरम्यान, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगाना, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश नक्षलवादापासून मुक्त झाले आहे. छत्तीसगडच्या काही भागांमध्ये  नक्षली आजून ठाण मांडून आहेत. पंतप्रधान मोदींना  तीसरा कार्यकाळ द्या मी तुम्हाला विश्वास देतो.  मोदीजी दोन वर्षात देशातील नक्षलवाद संपुष्टात आणतील. 

Edited By- Dhanashri Naik  

Go to Source