शिव साम्राज्य संघटनेचे अमीर नाईक यांना धक्काबुक्की

मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल मडगाव : मडगाव परिसरात गेल्या 9 वर्षांपासून शिवजयंतीच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिव साम्राज्य संघटनेचे प्रमुख अमीर नाईक यांना काल मिरवणुकीच्या दरम्यान दवर्ली येथे मारूती मंदिराजवळ धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी शिव साम्राज्यच्यावतीने मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आलेली आहे. शिव साम्राज्य, पर्यटन खाते व […]

शिव साम्राज्य संघटनेचे अमीर नाईक यांना धक्काबुक्की

मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल
मडगाव : मडगाव परिसरात गेल्या 9 वर्षांपासून शिवजयंतीच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिव साम्राज्य संघटनेचे प्रमुख अमीर नाईक यांना काल मिरवणुकीच्या दरम्यान दवर्ली येथे मारूती मंदिराजवळ धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी शिव साम्राज्यच्यावतीने मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आलेली आहे. शिव साम्राज्य, पर्यटन खाते व मडगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक मारूती मंदिराजवळ पोचली असताना अमीर नाईक यांना धक्काबुक्की करण्यात आली तसेच त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. ही धक्काबुक्की ‘राजे बॉयज’ यांनी केल्याचा दावा शिव साम्राज्य यांनी केला असून धक्काबुक्की व मारहाणीची धमकी देणाऱ्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करून शिव साम्राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मडगाव पोलिस स्थानकावर धाव घेतली.