अमेरिका सुपर एटमध्ये, पाक स्पर्धेबाहेर
पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना रद्द
वृत्तसंस्था/ लॉडरहिल, फ्लोरिडा
टी-20 विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी येथे होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे अमेरिका व आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या निकालामुळे अ गटात पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले असून अमेरिका 5 गुणांसह सुपर एट फेरीत पोहोचली आहे. आता आयर्लंडविरुद्ध होणारा पाकचा शेवटचा सामना बिनमहत्त्वाचा ठरणार आहे.
अमेरिकेने या स्पर्धेत अपेक्षेहून सरस कामगिरी करीत चारपैकी दोन सामने जिंकले. सुपर एट फेरी गाठण्यासाठी पाक व अमेरिका यांच्यात चुरस लागली होती. पण सामनाच रद्द झाल्यामुळे पाकच्या आशा संपुष्टात आल्या. अमेरिकेने सुपर एट फेरीबरोबरच 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली आहे. पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना अमेरिकेने शेजारी कॅनडा व पाकिस्तान संघांवर विजय मिळवित सनसनाटी निर्माण केली. भारतालाही त्यांनी अडचणीत आणले होते. पण सूर्या व दुबे यांनी भारताला सावरत विजय मिळवून दिला होता. अमेरिकेने पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक फेरी पार करीत आगेकूच करताना प्रभावी प्रदर्शन घडविले. या स्पर्धेआधी अमेरिकेची बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका झाली होती आणि त्यातही त्यांनी शानदार प्रदर्शन करीत मालिका जिंकली होती. या संघात भारतीय वंशाचे एकूण आठ खेळाडू असून पाकचे दोन, न्यूझीलंड, द.आफ्रिका देशाचे एकेक खेळाडू आहेत. प्राथमिक फेरीतील कामगिरीने त्यांचे मनोबल आणखी उंचावले असून सुपर एट फेरीतही ते धक्कादायक निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित सामने आता वेस्ट इंडीजमध्ये होणार असल्याने त्यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
Home महत्वाची बातमी अमेरिका सुपर एटमध्ये, पाक स्पर्धेबाहेर
अमेरिका सुपर एटमध्ये, पाक स्पर्धेबाहेर
पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना रद्द वृत्तसंस्था/ लॉडरहिल, फ्लोरिडा टी-20 विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी येथे होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे अमेरिका व आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या निकालामुळे अ गटात पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले असून अमेरिका 5 गुणांसह सुपर एट फेरीत पोहोचली आहे. आता आयर्लंडविरुद्ध होणारा पाकचा शेवटचा सामना बिनमहत्त्वाचा ठरणार […]