जपानला हरवून अमेरिका अंतिम फेरीत

वृत्तसंस्था /रांची ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत गुरुवारी अमेरिका संघाने आशियाई विजेत्या जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या विजयाबरोबरच अमेरिका महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिला हॉकी पात्र फेरीच्या स्पर्धेत गुरूवारच्या सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानने अमेरिकेवर […]

जपानला हरवून अमेरिका अंतिम फेरीत

वृत्तसंस्था /रांची
ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत गुरुवारी अमेरिका संघाने आशियाई विजेत्या जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या विजयाबरोबरच अमेरिका महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिला हॉकी पात्र फेरीच्या स्पर्धेत गुरूवारच्या सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानने अमेरिकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 38 व्या मिनिटाला जपानचे खाते अमिरू शिमादाने केला. तत्पूर्वी म्हणजे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी आक्रमक खेळाच्या जोरावर गोलपोस्टपर्यंट मुसंडी मारूनही त्यांना आपले खाते उघडता आले नाही. या सामन्यात 11 व्या मिनिटाला अमेरिकेला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण जपानच्या गोलरक्षकाने तो थोपविला जपानने आक्रमक खेळावर भर दिला होता. 17 व्या मिनिटाला जपानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांच्या खेळाडूने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेला. 26 व्या मिनिटाला जपानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि तो वाया गेला. 38 व्या मिनिटाला जपानचे खाते पेनल्टी कॉर्नरवर अमिरू शिमादाने उघडले. या सामन्यातील शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये अमेरिकेच्या आघाडी फळीने पाठोपाठ आक्रमणे करत जपानच्या बचाव फळीवर तसेच गोलरक्षकावर दडपण आणले होते. 52 व्या मिनिटाला अमेरिकेला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या अॅस्ले हॉपमनने गोल नोंदवून जपानशी बरोबरी साधली. 55 व्या मिनिटाला अमेरिकेला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या अॅबीगेल टेमरने अचूक गोल नोंदवून जपानचे आव्हान संपुष्टात आणले. सामना संपण्यास 1 मिनिट बाकी असताना अमेरिकेला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. रांचीतील या स्पर्धेत अमेरिकन महिला संघाने आतापर्यंत एकही सामना न गमविताना अंतिम फेरी गाठली आहे. तर त्यांनी येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला.
इटली विजयी
इटलीने गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी सामन्यात चिलीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. या सामन्यात चिलीने 13 व्या मिनिटाला फ्रांसिस्का टेलाच्या मैदानी गोलवर आपले खाते उघडले. 20 व्या मिनिटाला ब्रुनीने मैदानी गोल करुन इटलीला बरोबरी साधून दिली.