विद्यार्थ्यांसाठी अंबिल वितरण योजना जारी

बेळगाव : सरकारकडून शाळेतील मुलांना पौष्टिक आहार म्हणून अंडी, केळी, चिक्की, शेंगदाणे आणि आता नाचण्याची अंबिल दिली जात आहे. मुलांच्या शैक्षणिक जीवनात पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावु लागला आहे, असे विचार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी काढले. कणबर्गी येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळा आणि इंग्रजी माध्यम विद्यालयात अंबिल देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात […]

विद्यार्थ्यांसाठी अंबिल वितरण योजना जारी

बेळगाव : सरकारकडून शाळेतील मुलांना पौष्टिक आहार म्हणून अंडी, केळी, चिक्की, शेंगदाणे आणि आता नाचण्याची अंबिल दिली जात आहे. मुलांच्या शैक्षणिक जीवनात पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावु लागला आहे, असे विचार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी काढले. कणबर्गी येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळा आणि इंग्रजी माध्यम विद्यालयात अंबिल देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. केएमएफ दूध डेअरीतर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहार म्हणून नाचण्याची अंबिल देण्यात येणार आहे. सरकारी आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस ही अंबिल दिली जाणार आहे. सरकारी योजनांचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवावा. त्याचबरोबर एक चांगला समाज घडविण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी अक्षरदासोह विभागाचे लक्ष्मण यकुंडी यांनी नाचण्याची अंबिल बालकांमधील कुपोषितता दूर करण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षण मंत्री मधू बंगाराप्पा यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन करून थेट मुलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. याप्रसंगी बेळगाव शहर बीईओ एल. एस. हिरेमठ, क्षेत्रसमन्वयक आय. डी. हिरेमठ, अक्षरदासोहचे सहाय्यक संचालक रामनगौड मुद्दकनगौडर, नगरसेविका अस्मिता पाटील, ता. पं. कार्यकारी अधिकारी रामर•ाr पाटील, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 150 मिली दुधामध्ये नाचण्याची अंबिल
सरकारी व अनुदानित मुलांना आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नाचण्याची अंबिल दिली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 150 मिली दुधामध्ये नाचण्याची अंबिल तयार केली जाणार आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात दूध उत्पादनात वाढ झाली आहे. अतिरिक्त दूध विक्री आणि दुधाची उपपदार्थांचे अतिरिक्त उत्पादन करणेही शक्य नाही. त्यामुळे सरकारी आणि अनुदानित शाळेतील मुलांना आठवड्यातून पाच दिवस दूध देण्याची क्षीरभाग्य योजना जारी करण्यात आली आहे. केएमएफ मार्फत मुलांना दूध वितरण केले जाणार आहे.