अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

ढोकळा हा पारंपारिक गुजराती पदार्थ आहे, तर कढीचे अनेक प्रकार भारतातातील प्रत्येक घरी बनवले जातात. आज आपण पाहणार आहोत कढी आणि ढोकळ्याची रेसिपी. तर चला जाणून घ्या कढी ढोकळा रेसीपी. ढोकळा साहित्य- 1 कप बेसन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

ढोकळा हा गुजराती पारंपारिक पदार्थ आहे, तर कढीचे अनेक प्रकार भारतातातील प्रत्येक घरी बनवले जातात. आज आपण पाहणार आहोत कढी आणि ढोकळ्याची रेसिपी. तर चला जाणून घ्या कढी ढोकळा रेसीपी. 

 

ढोकळा 

साहित्य-

1 कप बेसन

1/2 कप दही

1/2 कप पाणी आवश्यकतेनुसार 

1/2 चमचे इनो किंवा बेकिंग सोडा 

1/2 चमचा काळी मिरे पूड 

1/2 चमचा हळद 

चवीनुसार मीठ

 

ढोकळा रेसिपी-

एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, दही, हळद, काळी मिरे पूड आणि मीठ घालून मिक्स करावे. जर मिश्रण खूप घट्ट असेल तर थोडे पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. आता त्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. ढोकळा पिठ ग्रीस केलेल्या ढोकळ्याच्या स्टँडमध्ये किंवा मोठ्या स्टीमर ट्रेमध्ये घालावे. स्टँड किंवा ट्रे स्टीमरमध्ये ठेवावे. तसेच 15-20 मिनिटे वाफ येऊ द्या. तर चला तयार आहे आपला ढोकळा.

 

कढी  

साहित्य-

कप दही

1/4 कप बेसन

1/2 चमचे मोहरी

1/2 चमचे जिरे

2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या 

1 इंच आले चिरलेले 

8-10 कढीपत्ता

1/2 चमचे हळद  

1/2 चमचे लाल तिखट 

1/2 चमचे धणे पूड 

1/2 कप पाणी

1/2 चमचे तेल

चवीनुसार मीठ

 

कढी रेसिपी-

कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची, आले आणि कढीपत्ता घाला. मोहरी तडतडायला लागल्यावर त्यामध्ये बेसन घालून त्याचा कच्चा वास निघेपर्यंत तळून घ्या. तसेच एका बाऊलमध्ये दही चांगले फेटून त्यात बेसन घालावे. नंतर ते पॅनमध्ये घालून चांगले मिक्स करावे. हळद, तिखट, धणे पूड आणि मीठ घालावे. यानंतर हे मिश्रण उकळवा आणि मंद गॅसवर 10-15 मिनिटे शिजवा. तसेच कढी घट्ट होईपर्यंत शिजवा. व आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

 

सर्व्हिंग-

तयार ढोकळ्याचे लहान तुकडे करावे.

कढी एका सर्व्हिंग भांड्यात घाला आणि त्यात ढोकळ्याचे तुकडे घाला.

हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सजवा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik