व्हेरेवला हरवून अॅलिसिमे उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / ट्यूरीन (इटली)
2025 च्या टेनिस हंगामाअखेर येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलिसिमेने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. इटलीच्या सिनरने या स्पर्धेत आपली विजय घोडदौड कायम राखत उपांत्य फेरी गाठली आहे.
कॅनडाच्या आठव्या मानांकीत अॅलिसिमेने जर्मनीच्या व्हेरेवचे आव्हान 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. व्हेरेवने यापूर्वी ही स्पर्धा दोनवेळा जिंकली होती. या विजयामुळे अॅलिसिमेने सदर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. अॅलिसिमे आणि इटलीचा सिनर हे दोघेही बिजॉर्न बोर्ग गटात आघाडीवर आहेत. या गटातील अन्य एका सामन्यात इटलीच्या सिनरने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव केला. सिनरचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. स्पेनच्या अल्कारेझने या स्पर्धेची उपांत्य फेरी यापूर्वीच गाठत वर्षअखेरीस मानांकनातील आपले अग्रस्थान कायम केले आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी होत आहे.
Home महत्वाची बातमी व्हेरेवला हरवून अॅलिसिमे उपांत्य फेरीत
व्हेरेवला हरवून अॅलिसिमे उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / ट्यूरीन (इटली) 2025 च्या टेनिस हंगामाअखेर येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलिसिमेने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. इटलीच्या सिनरने या स्पर्धेत आपली विजय घोडदौड कायम राखत उपांत्य फेरी गाठली आहे. कॅनडाच्या आठव्या मानांकीत अॅलिसिमेने जर्मनीच्या व्हेरेवचे आव्हान 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये संपुष्टात […]
