सातत्याने भक्ती मार्गाचीच कास धरा

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : बेकिनकेरे लक्ष्मीदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात वार्ताहर /उचगाव भक्तीमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सातत्याने भक्ती मार्गाचीच कास धरा. चांगले चिंतन, मनन, ध्यान करा. लक्ष्मीची सदोदित कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी माझ्या जीवनात चांगले आचार, विचार आणि कष्ट घेत चांगल्या विचारांचीच कास धरत आलो, असे […]

सातत्याने भक्ती मार्गाचीच कास धरा

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : बेकिनकेरे लक्ष्मीदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात
वार्ताहर /उचगाव
भक्तीमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सातत्याने भक्ती मार्गाचीच कास धरा. चांगले चिंतन, मनन, ध्यान करा. लक्ष्मीची सदोदित कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी माझ्या जीवनात चांगले आचार, विचार आणि कष्ट घेत चांगल्या विचारांचीच कास धरत आलो, असे आवाहन बेळगाव ग्रामीणच्या आमदार व कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी बेकिनकेरे येथील लक्ष्मी देवी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष जयवंत नागोजी सावंत होते. बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा आणि मंदिर लोकार्पण व महाप्रसादचे आयोजन शुक्रवार दि. 1 मार्च रोजी करण्यात आले होते. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. गुऊवारी लक्ष्मी देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्ती प्रतिष्ठापना पार पाडली. गुऊसिद्धेश्वर महास्वामीजी कारंजीमठ यांच्या हस्ते कळसारोहण कार्यक्रम झाला. कळस उद्घाटन माजी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक  सावंत व मल्लाप्पा बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराचा लोकार्पण, उद्घाटन सोहळा लक्ष्मीताई हेब्बाळकर, माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम, उचगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, तुरमुरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, कॉन्ट्रॅक्टर एस. एल. चौगुले, बंटी पावशे या सर्वांच्या उपस्थितीत फितची गाठ सोडून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार
यावेळी लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पूजन, गाभारा उद्घाटन, दीपप्रज्वलन, तुळस पूजन  व अन्य विविध पूजा या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचा खास जीर्णोद्धार कमिटी, ग्रामस्थांतर्फे तालुका पंचायत सदस्या मलप्रभा गावडे व ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गावडे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मीदेवीची मूर्ती बनवलेले मूर्तिकार गुंडू लोहार, इंजिनिअर विनय पाटील यांचाही यावेळी सत्कार केला. नागनाथ हायस्कूल बेकिनकेरेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व नृत्यकला सादर केले. यावेळी कमिटीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते व सल्लागार कमिटीतर्फे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना देवींची मोमेंटो व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन मोरे यांनी प्रास्ताविक व मंदिराचा अहवाल वाचन केले. कलाप्पा कडोलकर, मनोहर बेळगावकर, रघुनाथ खांडेकर, माऊती पाटील यासह ग्रामपंचायतचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, वारकरी सांप्रदाय, महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.