Solapur Crime : सोलापुरातील बँकेत धनादेशामध्ये फेरफार ; चार लाखांची फसवणूक
सोलापुरातील बँकेत फसवणूक, धनादेशामध्ये फेरफार
सोलापूर : बैंक ऑफ महाराष्ट्रच्या धनादेशामध्ये फेरफार करून तीन लाख ९४ हजार २६९ रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ सप्टेंबर रोजी सोलापुरातील नवी पेठ येथील बँकेच्या शाखेत घडली.
याप्रकरणी उत्तम दत्तात्रय जाधव (वय ७१, रा. कासारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी एक अनोळखी व्यक्ती तसेच अमर तपेदार (रा. हरिद्वार, राज्य उत्तराखंड) अशा दोघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. २५ नोव्हेंबर रोजी सोलापुरातील नवी पेठ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत फिर्यादीने तेथील बॉक्समध्ये डिपॉझिट पावतीसह धनादेश जमा केला होता.
तो यातील अनोळखी आरोपींनी बँकेतील शिपायाची दिशाभूल करून काढून घेतला. त्यामध्ये फेरफार करून त्याने कॅनरा बँक, शाखा हरिद्वार, राज्य उत्तराखंड अमर तपेदार यांच्या खात्यामध्ये जमा केला.
ही बाब फिर्यादी जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजित पाटील तपास करत आहेत.
Home महत्वाची बातमी Solapur Crime : सोलापुरातील बँकेत धनादेशामध्ये फेरफार ; चार लाखांची फसवणूक
Solapur Crime : सोलापुरातील बँकेत धनादेशामध्ये फेरफार ; चार लाखांची फसवणूक
सोलापुरातील बँकेत फसवणूक, धनादेशामध्ये फेरफार सोलापूर : बैंक ऑफ महाराष्ट्रच्या धनादेशामध्ये फेरफार करून तीन लाख ९४ हजार २६९ रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ सप्टेंबर रोजी सोलापुरातील नवी पेठ येथील बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी उत्तम दत्तात्रय जाधव (वय ७१, रा. कासारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) […]
