मुनवळ्ळी धर्मांतर प्रकरणातील उर्वरितांवरही कारवाई करा

भाजप शिष्टमंडळाची पोलीसप्रमुखांकडे मागणी बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे एका दलित महिलेवर अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव घालण्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणातील सात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाने जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. मुनवळ्ळी येथे रफिक बेपारी याने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्याचा […]

मुनवळ्ळी धर्मांतर प्रकरणातील उर्वरितांवरही कारवाई करा

भाजप शिष्टमंडळाची पोलीसप्रमुखांकडे मागणी
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे एका दलित महिलेवर अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव घालण्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणातील सात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाने जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली. मुनवळ्ळी येथे रफिक बेपारी याने एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव घातला जात होता. यामुळे बेळगाव जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. जातीय सलोखा बिघडवणाऱ्या सात दोषींपैकी केवळ दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावरही कडक कारवाई करावी. तसेच या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. यावेळी भाजपचे राज्य माध्यम कमिटीचे सदस्य एफ. एस. सिद्दनगौडर, यल्लेश कोलकार, बाळेश चव्हाण, मल्लिकार्जुन, संतोष देशनूर यांच्यासह इतर उपस्थित होते.