मुलांसोबतच दोन माताही देताहेत दहावीची परीक्षा

एकाचवेळी माय-लेक दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार असल्याने सर्वत्र चर्चा बेळगाव : शिक्षण घेण्याला वयाचे बंधन नसते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण केले जाऊ शकते, हे दोन महिलांनी दाखवून दिले आहे. माता व मुले हे चौघेही एकाचवेळी आणि एकाच परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा देत आहेत. आता एकाचवेळी माय-लेक दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार असल्याने […]

मुलांसोबतच दोन माताही देताहेत दहावीची परीक्षा

एकाचवेळी माय-लेक दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार असल्याने सर्वत्र चर्चा
बेळगाव : शिक्षण घेण्याला वयाचे बंधन नसते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण केले जाऊ शकते, हे दोन महिलांनी दाखवून दिले आहे. माता व मुले हे चौघेही एकाचवेळी आणि एकाच परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा देत आहेत. आता एकाचवेळी माय-लेक दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार असल्याने याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. बेळगाव जिल्ह्यात रायबाग तालुक्यातील पलभावी या गावातील मलगौडा नायक-पाटील गर्व्हन्मेंट हायस्कूल येथे दोन महिलांनी आपल्या मुलांसोबत दहावीची परीक्षा दिली आहे. श्रीशैल मेत्री या विद्यार्थ्याने नियमित पद्धतीने दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता. तर शशिकला मेत्री या मध्यान्ह आहार कर्मचारी असून त्यांनी बहिस्थ पद्धतीने अर्ज दाखल केला होता. ब्रह्मलिंग मेत्री या विद्यार्थ्याने नियमित तर त्याची आई सुनंदा यांनी बहिस्थ पद्धतीने अर्ज केला होता. दोन्हीही माय-लेकांचे बैठक क्रमांक एकाच परीक्षा केंद्रांवर आले आहेत. आई व मुलगा हे दोघेही एकाचवेळी दहावीची परीक्षा देत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. शशिकला यांचे लहान वयात लग्न झाल्याने त्यांना दहावीची परीक्षा देता आली नव्हती. वयाच्या 34 व्यावर्षी त्या दहावीची परीक्षा देत आहेत. नोकरीसाठी दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असल्याने त्यांनी तयारी केली आहे.