तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटचे खातेवाटप ! जाणून घ्या कोणाला मिळाली महत्वाची खाती

तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटचे खातेवाटप ! जाणून घ्या कोणाला मिळाली महत्वाची खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नव्या सरकारच्या ७१ मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली. त्यापैकी तीस कॅबिनेट मंत्री, पाच स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. शपथ विधीनंतर खातेवाटपामध्ये महत्वाची खाती खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.
राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय कायम असून अमित शहा यांनी गृह आणि सहकार मंत्रालय आपल्याकडेच ठेवले आहे.
नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कायम आहे.
जेपी नड्डा यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच रसायने आणि खते मंत्रालय मिळाले.
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निर्मला सीतारामन यांच्याकडे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कायम आहे.
डॉ एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा भार देण्यात आला आहे
मनोहर लाल खट्टर यांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसेच उर्जा मंत्रालय सोपवण्यात आले आहे.
एच. डी. कुमारस्वामी यांना अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय मिळाले असून पीयूष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय मिळाले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली असून जितन राम मांझी यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय मिळाले आहे.
राजीव रंजन (लालन) सिंग यांना पंचायत राज मंत्रालय, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा भार मिळाला आहे.
सर्बानंद सोनोवाल यांना बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तर किंजरापू राम मोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय सोपवण्यात आले आहे.
डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. तर  गिरीराज सिंह यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय तर ज्योतिरादित्य सिंधिया यांना ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्रालय मिळाले आहे.
अन्नपूर्णा देवी यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय वाटप करण्यात आल हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय कायम आहे.
तर श्रीपाद नाईक यांना ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री, शोभा करंदलाजे या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री तर अजय टमटा हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री झाले आहेत