प्रजासत्ताक दिन परेडमध्ये मित्रदेशांना मानाचे स्थान

25 देशांमधील मुले कौशल्ये सादर करणार : एससीसी महिला कॅडेट्सही चमकणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या म्हणजेच 2024 च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये दोन गोष्टी खास असणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात 25 मित्र देशांतील मुलेही परेडचा भाग असतील. तसेच ह्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नॅशनल पॅडेट कॉर्प्सच्या (एनसीसी) तुकडीमध्ये सर्वाधिक महिला पॅडेट्स असतील. प्रजासत्ताक दिन शिबिराचा मूळ उद्देश […]

प्रजासत्ताक दिन परेडमध्ये मित्रदेशांना मानाचे स्थान

25 देशांमधील मुले कौशल्ये सादर करणार : एससीसी महिला कॅडेट्सही चमकणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या म्हणजेच 2024 च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये दोन गोष्टी खास असणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात 25 मित्र देशांतील मुलेही परेडचा भाग असतील. तसेच ह्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नॅशनल पॅडेट कॉर्प्सच्या (एनसीसी) तुकडीमध्ये सर्वाधिक महिला पॅडेट्स असतील. प्रजासत्ताक दिन शिबिराचा मूळ उद्देश पॅडेट्समध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची भावना जागृत करणे हा आहे. दरवषी होणाऱ्या या कार्यक्रमात पॅडेट्सना प्रशिक्षणासोबत सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळते.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला आता केवळ 25 दिवस राहिले असून आतापासूनच संचलनाची रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. परेडच्या तयारीच्या दृष्टीने एनसीसीचे पथक दिल्ली कँटोन्मेंटमधील करिअप्पा परेड मैदानावर पूर्वतयारी करत आहेत. नॅशनल पॅडेट कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एनसीसी पॅडेट्ससह 25 मित्र देशांतील मुलेही परेडचा भाग असतील. शिबिरात सहभागी होणारी ही मुले युवा विनिमय कार्यक्रमाचा भाग आहेत. अर्जेंटिना, बोत्सवाना, भूतान, ब्राझील, झेक प्रजासत्ताक, फिजी, कझाकिस्तान, केनिया, किर्गिस्तान, लाओस, मलेशिया, मालदीव आणि नेपाळ या देशांतील मुले परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या देशांव्यतिरिक्त, रशिया, सौदी अरेबिया, सेशेल्स, ताजिकिस्तान, ब्रिटन, व्हेनेझुएला, व्हिएतनाम, श्रीलंका, सिंगापूर, नायजेरिया, मॉरिशस आणि मोझांबिक येथील पॅडेट्स देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग असतील.
लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्या मते, प्रजासत्ताक दिन सेलिब्र्रेशन 2024 च्या परेडमध्ये सर्व 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील एनसीसी पॅडेट्स सहभागी होतील. एनसीसी परेडसाठी एकूण 2,274 पॅडेट्सची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 907 महिला पॅडेट्सचा समावेश आहे. महिला पॅडेट्सचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील 122 पॅडेट्ससह पूर्वोत्तर विभागातील 171 पॅडेट्स देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणार आहेत.