राकसकोपचे तिन्ही दरवाजे दहा इंचांनी खुले
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशीही जोर कायम राहिल्याने जलाशयाला मिळणाऱ्या मार्कंडेय नदीच्या उगमापासून आणि जांभूळ ओहळमधून पाण्याचा ओघ वाढल्याने जलाशयात पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सकाळी पाणीपातळीही 2476.50 फूट होती. यावर्षीचा सर्वात जादा पाऊस 127.8 मि.मी. नोंद झाला. एकूण 1572.4 मि.मी. पाऊस झाला. बुधवारी 2475.40 फूट पाण्याच्या पातळीत दोन दरवाजे 8 इंचाने आणि एक दरवाजा 2 इंचाने उघडल्यानंतर एक फुटाने पाणीपातळी वाढली. गुरुवारी सकाळपासून दिवसभर दहा इंचाने तिन्ही दरवाजे उघडल्यानंतरही पाण्याचा प्रचंड ओघाने जलाशयाची पाणीपातळी सायंकाळी 6 वाजता 2477 फुटापर्यंत गेली. मार्कंडेय नदीला मिळणाऱ्या सर्व नाल्यांना पुराचा फटका बसला आहे. मार्कंडेय नदी पात्राच्या बाजूच्या पिकांतून पुराचे पाणी शिरल्याने बरीच पिके नुकसानीत गेली आहेत. तर नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तुडये शिनोळी रस्त्यातील शिनोळी गावाशेजारील पुलाशेजारील रस्त्यावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद पडला आहे. जोरदार वादळी पावसाने पुरातील पिके जमिनदोस्त झाली आहेत. तीन दिवसांत 300 मि. मी. पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात एकूण 1173.5 मि.मी. पाऊस झाला आहे.
Home महत्वाची बातमी राकसकोपचे तिन्ही दरवाजे दहा इंचांनी खुले
राकसकोपचे तिन्ही दरवाजे दहा इंचांनी खुले
वार्ताहर /तुडये बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशीही जोर कायम राहिल्याने जलाशयाला मिळणाऱ्या मार्कंडेय नदीच्या उगमापासून आणि जांभूळ ओहळमधून पाण्याचा ओघ वाढल्याने जलाशयात पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सकाळी पाणीपातळीही 2476.50 फूट होती. यावर्षीचा सर्वात जादा पाऊस 127.8 मि.मी. नोंद झाला. एकूण 1572.4 मि.मी. पाऊस झाला. बुधवारी 2475.40 फूट […]