चार महिन्यात जैतनमाळचा सर्वांगीण विकास करू : हेब्बाळकर

बेळगाव : काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर विजयी झाल्यास जैतनमाळ दत्तक घेऊन सर्वांगिण विकास करण्यात येईल, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील जैतनमाळ येथे निवडणुकीचा प्रचार करून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या भागाची दुरवस्था पाहिल्यास आपणालाही अत्यंत वाईट वाटते. या भागात किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक […]

चार महिन्यात जैतनमाळचा सर्वांगीण विकास करू : हेब्बाळकर

बेळगाव : काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर विजयी झाल्यास जैतनमाळ दत्तक घेऊन सर्वांगिण विकास करण्यात येईल, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील जैतनमाळ येथे निवडणुकीचा प्रचार करून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या भागाची दुरवस्था पाहिल्यास आपणालाही अत्यंत वाईट वाटते. या भागात किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील विकास खुंटला आहे, असा आरोप त्यांनी केला. जैतनमाळ परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर निवडून आले तर या भागाचा चार महिन्यांमध्ये सर्वांगिण विकास करू. यासाठी मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रचारादरम्यान स्थानिक महिलांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. जुने बेळगाव नाका ते कलमेश्वर मंदिरपर्यंत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन प्रचार केला. यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह देवराज खन्नुकर, नगरसेविका लक्ष्मी लोकरे, मल्लसर्जु पाटील, तुकाराम होसूरकर, एन. वाय. खन्नुकर, डॉ. सुकिर्त भंडारी, माधुरी जाधव आदी उपस्थित होते.