Raju Shetti : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा; राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

                      सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय आंदोलन सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. सांगली शहरातील मध्यवर्ती […]

Raju Shetti : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा; राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

                      सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय आंदोलन
सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
सांगली शहरातील मध्यवर्ती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाड्या व ट्रॅक्टरसह मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, महिला शेतकरी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची टीका केली. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असून, काही आमदार या प्रक्रियेला पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पिकाऊ जमिनी रस्त्यासाठी वापरून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान सरकारने रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
महामार्गाच्या कंत्राटदारांकडून आलेल्या पैशातून २०२९ च्या निवडणुकीची तयारी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यभर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चे, धरणे व निदर्शने सुरू असून हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान राजू शेट्टी यांनी प्रतीकात्मक खर्डा-भाकरी खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.