महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष
प्रादेशिक आयुक्तांकडून सोमवारी निवडणूक तारीख जाहीर होण्याची शक्यता
बेळगाव : विद्यमान महापौरांचा कालावधी दि. 5 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासाठी महापालिकेतील कौन्सिल विभागातून प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडून कोणताच प्रस्ताव आला नाही. मात्र सोमवारी त्याबाबत निर्णय देऊ, असे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे सोमवारी महापौर व उपमहापौर निवडणूक कधी होणार हे समजणार आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत होती. येत्या एक-दोन दिवसांमध्ये ही निवडणूक जाहीर केली जाईल, असे जाणकारांचे मत आहे. त्यानुसार आता प्रादेशिक आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभेपूर्वी महापौर, उपमहापौर निवडणूक जाहीर होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन दिवसांत तारीख जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारपर्यंत कोणताच आदेश आला नसला तरी सोमवारी याबाबत प्रस्ताव मिळणार असल्याचे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले.
महापौरपद अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे तर उपमहापौरपद हे सर्वसाधारण पुरुषवर्गासाठी आहे. सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यांचे 35 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचेच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे सरकार कशाप्रकारे या निवडणुकीची प्रक्रिया राबविणार हे पहावे लागणार आहे. वास्तविक महापौर, उपमहापौर निवडणुकीची तारीख जाहीर करणे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तर महापौर, उपमहापौर निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याची भीती लागून होती. त्यामुळे सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी गटामध्येही दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर अधिकाऱ्यांनाही लक्ष्य बनविले जात आहे. त्यामुळे पालकमंत्री जारकीहोळी कोणती भूमिका घेणार? यावरच सर्व अवलंबून राहणार आहे. दरम्यान प्रादेशिक आयुक्त लवकरच निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले.
महापौरपदासाठी सत्ताधारी गटाकडे केवळ दोनच नगरसेविका
महापौर, उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तारीख निश्चित होताच त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. उपमहापौर पदासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी गटाकडे केवळ दोनच नगरसेविका आहेत. तर उपमहापौरपदासाठी अधिक नगरसेवक असल्याने त्यामध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे.
Home महत्वाची बातमी महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष
महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष
प्रादेशिक आयुक्तांकडून सोमवारी निवडणूक तारीख जाहीर होण्याची शक्यता बेळगाव : विद्यमान महापौरांचा कालावधी दि. 5 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासाठी महापालिकेतील कौन्सिल विभागातून प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडून कोणताच प्रस्ताव आला नाही. मात्र सोमवारी त्याबाबत निर्णय देऊ, असे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे सोमवारी महापौर व उपमहापौर […]