अली फजल अभिनयातून घेणार ब्रेक
लवकरच होणार आहे पिता
बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चड्ढा हे दांपत्य सध्या स्वत:च्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे ऋचा हीरामंडी या सीरिजमध्ये दिसून आली होती. तर अली लवकरच मिर्झापूर 3 मध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर हे दांपत्य लवकरच स्वत:च्या पहिल्या अपत्याचे स्वागत करणार आहे.
अभिनेत्री जुलै महिन्यात स्वत:च्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. अशा स्थितीत दांपत्य अत्यंत आनंदी असून दोघेही बाळासोबत भरपूर वेळ घालविण्यासाठी नियोजन करत आहेत. याचमुळे अलीने स्वत:च्या कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अली 30 जूनपर्यंत स्वत:ची सर्व प्रोफेशनल कामे आटोपून घेणार आहे. यानंतर तो पत्नी ऋचा आणि होणाऱ्या अपत्याची काळजी घेणार आहे. अशा स्थितीत अली हा किमान दोन महिन्यांपर्यंत कुठल्याही प्रोजेक्टसाठी चित्रिकरण करणार नाही.
अली हा ‘मेट्रो इन दिनों’ आणि ‘लाहौर 1947’ चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटांचे चित्रिकरण जवळपास पूर्ण झाले आहे. तर ठग लाइफ या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण तो पुढील काही दिवसात संपविणार आहे, उर्वरित चित्रिकरण मग ऑगस्टच्या अखेरीस सुरू करणार आहे.
Home महत्वाची बातमी अली फजल अभिनयातून घेणार ब्रेक
अली फजल अभिनयातून घेणार ब्रेक
लवकरच होणार आहे पिता बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चड्ढा हे दांपत्य सध्या स्वत:च्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे ऋचा हीरामंडी या सीरिजमध्ये दिसून आली होती. तर अली लवकरच मिर्झापूर 3 मध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर हे दांपत्य लवकरच स्वत:च्या पहिल्या अपत्याचे स्वागत करणार आहे. अभिनेत्री जुलै महिन्यात स्वत:च्या पहिल्या अपत्याला जन्म […]