सिनेरला हरवून अल्कारेझ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ इंडियन्स वेल्स (कॅलिफोर्निया) एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने एकेरीच्या उपांत्य सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात द्वितीय मानांकित अल्कारेझने सिनेरचा 1-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. या पराभवामुळे सिनेरची गेल्या 11 सामन्यातील विजयी […]

सिनेरला हरवून अल्कारेझ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ इंडियन्स वेल्स (कॅलिफोर्निया)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने एकेरीच्या उपांत्य सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात द्वितीय मानांकित अल्कारेझने सिनेरचा 1-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. या पराभवामुळे सिनेरची गेल्या 11 सामन्यातील विजयी घोडदौड खंडीत झाली. गेल्या वर्षी सिनेरने 19 सलग सामने जिंकले होते. तर चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील त्याच्या सलग 16 सामन्यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये तैवानची हेस सुवेई आणि बेल्जियमची इलेस मर्टन्स यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ऑस्ट्रेलियाची हंटर आणि झेक प्रजासत्ताकची सिनियाकोव्हा यांचा 6-3, 6-4 असा फडशा पाडला. या जेतेपदाबरोबरच हेस आणि मर्टन्स यांना 447,300 डॉलर्सचे बक्षीस मिळाले.