अलतगे खो खो संघाचा सत्कार

कंग्राळी बुद्रुक : बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत यश मिळविणाऱ्या अलतगे ब्रम्हलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या खो खो पटूंचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रमेश कांबळे होते. व्यासपीठावर समिक्षा पाटील, संचिता पाटील, साहिली चौगुले, आर. आर. जाधव उपस्थित होते. प्रास्ताविकमध्ये प्रकाश टक्केकर यांनी उपस्थित सत्कारमूर्तीचे स्वागत केले. यानंतर शाळेच्यावतीने व ग्रामस्थांच्यावतीने यशस्वी खेळाडूंचा शाल, श्रीफळ […]

अलतगे खो खो संघाचा सत्कार

कंग्राळी बुद्रुक : बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत यश मिळविणाऱ्या अलतगे ब्रम्हलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या खो खो पटूंचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रमेश कांबळे होते. व्यासपीठावर समिक्षा पाटील, संचिता पाटील, साहिली चौगुले, आर. आर. जाधव उपस्थित होते. प्रास्ताविकमध्ये प्रकाश टक्केकर यांनी उपस्थित सत्कारमूर्तीचे स्वागत केले. यानंतर शाळेच्यावतीने व ग्रामस्थांच्यावतीने यशस्वी खेळाडूंचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा शिक्षक आर. आर. जाधव यांचाही गौरव करण्यात आला. विजेत्या खेळाडूना शुभम पाटील यांनी खेळाडूंना ट्रॅकसूट दिला. तर सुरेश घुग्रेटकर, प्रकाश टक्केकर यांनीही आर्थिक सहकार्य केले.