अखिलेश यादव अद्याप ईव्हीएमविरोधात

80 जागा जिंकलो तरीही विश्वास नसेल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभेत मंगळवारी समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी ईव्हीएमवर टिप्पणी केली आहे. मला अद्याप ईव्हीएमवर भरवसा नाही. उत्तरप्रदेशात 80 पैकी 80 जागा जिंकलो तरीही मी ईव्हीएमवर भरवसा ठेवणार नाही. ईव्हीएम जोपर्यंत हटविण्यात येणार नाही, […]

अखिलेश यादव अद्याप ईव्हीएमविरोधात

80 जागा जिंकलो तरीही विश्वास नसेल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत मंगळवारी समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी ईव्हीएमवर टिप्पणी केली आहे. मला अद्याप ईव्हीएमवर भरवसा नाही. उत्तरप्रदेशात 80 पैकी 80 जागा जिंकलो तरीही मी ईव्हीएमवर भरवसा ठेवणार नाही. ईव्हीएम जोपर्यंत हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत समाजवादी पक्ष ईव्हीएमचा मुद्दा लावून धरणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोग आणि सरकारने काही निवडक लोकांवर कृपादृष्टी दाखविली आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असताना आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. निवडणूक आयोग निष्पक्ष झाले तरच लोकशाही मजबूत होणार असल्याचे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे.
अखिलेश यांनी यावेळी अयोध्येचा उल्लेख करत भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. ‘होई वही जो राम रुचि राखा’ ही ओळ ऐकवत त्यांनी अयोध्येत समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांचा विजय आणि भाजपच्या पराभवाचा उल्लेख केला.