अकबर-बिरबलची कहाणी : अधिक चतुर
Kids story : बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. व बिरबलाला प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. तसेच बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : पगडीत पंख
पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण?
बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.
पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणता?
बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : हिरवा घोडा
बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ”महाराज, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहे.”
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : आकाशातील तारे
Edited By- Dhanashri Naik
