आकाश एज्युकेशनचे नवे एमडी मेहरोत्रा
नवी दिल्ली
एडटेक स्टार्टअप बायजूची स्वत:ची कंपनी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडने दीपक मेहरोत्रा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये अभिषेक माहेश्वरी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
‘मेहरोत्रा यांनी तत्काळपणे पदभार स्वीकारला आहे’, असे कंपनीने निवेदन जारी केले. त्याचवेळी, बायजूचे संस्थापक आणि अध्यक्ष बायजू रवींद्रन म्हणाले, ‘पियरसन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची व्यावसायिक कौशल्ये पाहून व त्यांचा एकंदर प्रदीर्घ अनुभव पाहून त्यांना कंपनीत घेतलं आहे. या अनुभवाचा लाभ बायजु, आकाश यांना आगामी काळात नक्कीच होईल, अशी आशा आहे.
मेहरोत्रांना 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव
दीपक मेहरोत्रा यांना एफएमसीजी, दूरसंचार आणि शिक्षणसह विविध क्षेत्राचा 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी ते 2018 ते 2023 पर्यंत आशीर्वाद पाईप्समध्ये एमडी होते. याशिवाय त्यांनी भारती एअरटेल, कोका-कोला आणि एशियन पेंट्समध्ये काम केले आहे.
Home महत्वाची बातमी आकाश एज्युकेशनचे नवे एमडी मेहरोत्रा
आकाश एज्युकेशनचे नवे एमडी मेहरोत्रा
नवी दिल्ली एडटेक स्टार्टअप बायजूची स्वत:ची कंपनी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडने दीपक मेहरोत्रा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये अभिषेक माहेश्वरी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. ‘मेहरोत्रा यांनी तत्काळपणे पदभार स्वीकारला आहे’, असे कंपनीने निवेदन […]