आकाश आनंदच मायावतींचा राजकीय उत्तराधिकारी
राष्ट्रीय संयोजक पद पुन्हा प्रदान
वृत्तसंस्था/ लखनौ
मायावती यांनी स्वत:चा भाचा आकाश आनंद याला पुन्हा एकदा स्वत:चा राजकीय उत्तराधिकारी घोषित केले आहे. तसेच मायावती यांनी आनंद यांना पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्त केले आहे. तर शनिवारीच आकाश यांची उत्तराखंड पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून घोषणा करण्यात आली होती.
मायावत यांनी रविवारी लखनौमध्ये बसपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसोबत आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीला आकाश आनंद देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान आनंद यांनी मायावती यांच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतले आहेत. तर उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाचा आकाश आनंदच्या पाठीवर थाप देत त्याचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मायावती यांनी एका निर्णयाद्वारे सर्वांना चकित केले होते. त्यांनी भाचा आकाश आनंदला ‘अपरिपक्व’ ठरवत पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकपदावरून हटविले होते. तसेच परिपक्व होईंपर्यंत आकाश आनंदला स्वत:चा उत्तराधिकारी घोषित करण्यासही नकार दिला होता. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद हे बसपच्या अनेक जाहीरसभांमध्ये अत्यंत आक्रमक दिसून आले होते. त्यांच्या काही भाषणांची मोठी चर्चा झाली होती, ज्यात त्यांनी स्वत:च्या विरोधकांवर तीव्र टिप्पणी केली होती.
मायावतींनी केली होती कारवाई
आकाश आनंद यांनी एका भाषणात भाजपला दहशतवादी पक्ष संबोधिले होते. यावरून आकाश यांच्यावर एफआयआरही नोंदविला गेला होता. आकाश यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बसपला नवसंजीवनी मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत तयार झाले होते. परंतु याचदरम्यान मायावती यांनी आकाश यांना बसपच्या राष्ट्रीय संयोजकपदावरून हटविण्याची घोषणा केली. आकाश यांना अजून परिपक्व होण्याची गरज असल्याचे मायावती यांनी म्हटले होते. तर लोकसभा निवडणुकीत बसपची मोठी पिछेहाट झाली. बसपला खातेही उघडता आले नाही. उलट उत्तरप्रदेशात बसपची मतांची हिस्सेदारी 19 टक्क्यांवरून कमी होत 10 टक्क्यांच्या आसपास राहिली आहे.
पुन्हा सोपविली जबाबदारी
आकाश आनंद यांना पुन्हा एकदा जबाबदारी सोपवून मायावती यांनी एकप्रकारे स्वत:ची चूक सुधारली आहे. उत्तरप्रदेशात आगामी काळात 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. बसपने नेहमीच पोटनिवडणूक न लढविण्याचे धोरण अवलंबिले आहे. परंतु यावेळी मायावती यांनी सर्व 10 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीकरता उमेदवार उभे करण्याचा निर्णय मायावती यांन ाr जाहीर केला आहे. राष्ट्रीय संयोजक पदावर वापसी झाल्यावर उत्तरप्रदेशची जबाबदारी आकाश आनंद यांच्याकडे आली आहे. पोटनिवडणुकीकरता तिकिटवाटपापासून पक्षासाठी प्रचार करताना ते दिसून येणार आहेत.
संयमाने वागण्याचा सल्ला
आकाश यांनी राष्ट्रीय संयोजक करण्याची तयारी मायावती यांनी सुमारे आठवड्यापूर्वीच केली हीत. 16 जून रोजी आकाश हे लखनौ येथे दाखल झाले होते, जेथे सर्व जुन्या मुद्द्यांवरून मायावतींनी त्यांच्याशी चर्चा केली होती. मायावती यांनी आकाश यांना अधिक संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. बसपने आता 2027 मध्ये होणाऱ्या राज्य विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन वर्षांपूर्वी आकाश यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवत मायावती यांनी त्यांना पुरेशा तयारीची संधी दिली आहे.
Home महत्वाची बातमी आकाश आनंदच मायावतींचा राजकीय उत्तराधिकारी
आकाश आनंदच मायावतींचा राजकीय उत्तराधिकारी
राष्ट्रीय संयोजक पद पुन्हा प्रदान वृत्तसंस्था/ लखनौ मायावती यांनी स्वत:चा भाचा आकाश आनंद याला पुन्हा एकदा स्वत:चा राजकीय उत्तराधिकारी घोषित केले आहे. तसेच मायावती यांनी आनंद यांना पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्त केले आहे. तर शनिवारीच आकाश यांची उत्तराखंड पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून घोषणा करण्यात आली होती. मायावत यांनी रविवारी लखनौमध्ये […]