नोव्हेंबरपासून हेलिकॉप्टरद्वारे एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर हवाई माध्यमातून रुग्णवाहिका तुमच्यापर्यंत क्षणार्धात पोहचणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका (एअर अॅम्ब्युलन्स) सेवेसह अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.आबिटकर यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार असून, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस 108) अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होईल. यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील २०० आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील. आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांच्या सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.नव्या रुग्णवाहिकांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. तसेच या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा बसवली जाईल. फाइव्ह जी तंत्रज्ञानावर आधारित या रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरसह २५हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील.एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभहोईल. अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमीत एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत 10 वर्षांचा करार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 200 रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. एअर अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटीदेखील रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत, असं आबिटकर यांनी सांगितलंहेही वाचाठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार
आरे, SGNP तील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळणार
Home महत्वाची बातमी नोव्हेंबरपासून हेलिकॉप्टरद्वारे एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
नोव्हेंबरपासून हेलिकॉप्टरद्वारे एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर हवाई माध्यमातून रुग्णवाहिका तुमच्यापर्यंत क्षणार्धात पोहचणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका (एअर अॅम्ब्युलन्स) सेवेसह अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
आबिटकर यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार असून, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस 108) अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होईल.
यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील २०० आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील. आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांच्या सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
नव्या रुग्णवाहिकांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
तसेच या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा बसवली जाईल. फाइव्ह जी तंत्रज्ञानावर आधारित या रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरसह २५हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील.
एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभहोईल.
अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमीत एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत 10 वर्षांचा करार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात 200 रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. एअर अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटीदेखील रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत, असं आबिटकर यांनी सांगितलंहेही वाचा
ठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणारआरे, SGNP तील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळणार