शेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन

पाचगाव वार्ताहर शेंडा पार्क येथे आगी मध्ये शेकडो झाडे, पक्षांची घरटी, पिल्ली,अंडी भस्मसात झाली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शेंडा पार्क येथील झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कृती करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. शेंडा पार्क येथे लागलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात […]

शेंडा पार्क येथील वृक्षांच्या जळीतकांडानंतर कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार; शिवसेना ठाकरे गटाचे हल्लाबोल आंदोलन

पाचगाव वार्ताहर

शेंडा पार्क येथे आगी मध्ये शेकडो झाडे, पक्षांची घरटी, पिल्ली,अंडी भस्मसात झाली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शेंडा पार्क येथील झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कृती करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
शेंडा पार्क येथे लागलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली होती. ही झाडे वाचवण्यासाठी प्रशासनामार्फत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने सोमवारी सकाळी बारा वाजता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.
यावेळी शेंडा पार्क येथे पक्ष्यांची घरटी, अंडी, पिली,जळून मृत्यू मुखी पडली. शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या आश्वासनांवर पर्यावरण टिकणार नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. वृक्ष लागवड योजनेच्या नावाखाली शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप निवेदनाद्वारे करत शेंडा पार्क मधील जागा भूखंड माफीयांच्या घशात जाऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात.तसेच या परिसरात आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी झाड लावणे आणि झाड जगवणे यात फरक असल्याचे सांगत केवळ 40हजार झाडे लावली असे न सांगता त्यातील किती झाडे जगवली हे पाहणे महत्त्वाचे आहे असे सांगत कोल्हापूरची जनता दानशूर आहे. प्रशासनाने आवाहन केल्यास या झाडांना जगवण्यासाठी हजारो मदतीचे हात पुढे येतील असे सांगितले.
शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी शेंडा पार्क परिसरात शेकडो झाडे आगित भस्मसात झाली तरीही प्रशासनाचा एकही अधिकारी जागेवर फिरकला नसल्याचे सांगित जी झाडे जगण्यासारखी आहे अशा झाडांना जगण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली . यावेळी शिवसैनिकांनी गवताचा लिलाव खरेदी करणारेच गवत कापून झाले की उरलेल्या गवताला जाणीवपूर्वक आग लावत असल्याचा आरोप केला.
आंदोलकांनी आंदोलन स्थळी येताना शेंडा पार्क येथील आगीत जळलेले झाड सोबत आणले होते. आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला जाळले अशा आशयाचा फलक झाडाभोवती लावला होता. यावेळी सहयोगी अधिष्ठाता एस बी खरबडे यांनी आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन झाडे जगवण्यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
यावेळी संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, विवेक काटकर, अवधूत साळुंखे, अरून अब्दागिरी, विनोद खोत,अनिल पाटील, गोविंद वाघमारे, अभिजीत पोरे, साहिल अत्तार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.