पश्चिम बंगालमधून आलेला अग्निवीर प्रशिक्षणार्थी बेपत्ता

बेळगाव : अग्निवीरच्या प्रशिक्षणासाठी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री प्रशिक्षण केंद्रावर आलेला पश्चिम बंगालमधील एक तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रितम राधेशाम घोष (वय 20) रा. पंचधार, ता. तेहता, जि. नदिया, पश्चिम बंगाल असे त्याचे नाव आहे. एप्रिलपासून कॅम्प येथील एमएलआयआरसी प्रशिक्षण केंद्रावर तो अग्निवीर […]

पश्चिम बंगालमधून आलेला अग्निवीर प्रशिक्षणार्थी बेपत्ता

बेळगाव : अग्निवीरच्या प्रशिक्षणासाठी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री प्रशिक्षण केंद्रावर आलेला पश्चिम बंगालमधील एक तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रितम राधेशाम घोष (वय 20) रा. पंचधार, ता. तेहता, जि. नदिया, पश्चिम बंगाल असे त्याचे नाव आहे. एप्रिलपासून कॅम्प येथील एमएलआयआरसी प्रशिक्षण केंद्रावर तो अग्निवीर प्रशिक्षण घेत होता. गुरुवार दि. 4 जुलै रोजी पहाटे 5 पासून तो बेपत्ता झाला आहे. एमएलआयआरसीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईलही बंद आहे. त्यामुळे नाईक सुभेदार संतोष दिलीप घोरपडे यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या तरुणाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405234 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.