अतिथी प्राध्यापकांचे सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन

निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन त्वरित पूर्ण करण्याची मागणी बेळगाव : राज्यातील विविध सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये सेवा बजाविणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील 430 पेक्षा अधिक सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये 12 हजारांपेक्षा अधिक अतिथी प्राध्यापक गेल्या 10 वर्षांपेक्षाहून अधिककाळ सेवा […]

अतिथी प्राध्यापकांचे सेवेत कायम करण्यासाठी आंदोलन

निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन त्वरित पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील विविध सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये सेवा बजाविणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील 430 पेक्षा अधिक सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयांमध्ये 12 हजारांपेक्षा अधिक अतिथी प्राध्यापक गेल्या 10 वर्षांपेक्षाहून अधिककाळ सेवा बजावत आहेत. गौरवधनावर सेवा बजाविणाऱ्या अतिथी प्राध्यापकांना महागाईच्या काळात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. आज ना उद्या सेवेत कायम होईन, या आशेवर सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वय निघून गेले आहे. त्यामुळे इतर ठिकाणी काम मिळणे कठीण आहे. राज्य सरकारने इतर विविध सरकारी खात्यांमधील कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करून घेतले आहे.
त्याप्रमाणेच अतिथी प्राध्यापकांनाही सेवेत कायम करून घ्यावे. देशातील अनेक राज्यांमध्ये अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करून घेण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही येथील अतिथी प्राध्यापकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत दि. 22 नोव्हेंबरपासून अनिश्चित कालावधीसाठी धरणे सत्याग्रह प्रारंभ करण्यात आला आहे. अधिवेशन काळात आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.