पंचमसाली समाजाला आरक्षणासाठी बसवजय मृत्युंजय स्वामीजींची पत्रचळवळ
आमदारांच्या घरांसमोर चळवळीला प्रारंभ
बेळगाव : पंचमसाली समाजाला 2ए आरक्षण मिळावे, यासाठीच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आता पंचमसाली समाजातील आमदारांच्या घरासमोर पत्रचळवळ सुरू करण्यात आली आहे. बुधवार दि. 3 जुलैपासून ही चळवळ सुरू झाल्याची माहिती कुडलसंगम येथील श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी दिली. शुक्रवारी महात्मा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समाजाचे नेते गुंडू पाटील, शिवनगौडा पाटील व इतर उपस्थित होते. संपूर्ण राज्यातील समाजाच्या आमदारांच्या घरासमोर चळवळ होणार आहे. त्यांच्यावर दबाव निर्माण व्हावा, यासाठी ही चळवळ असल्याचे स्वामीजींनी सांगितले.
2ए आरक्षणासंबंधी आजवरच्या सरकारांनी केवळ आश्वासने दिली आहेत. 2डी आरक्षण मिळाले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता 2ए मिळविण्यासाठी समाजातील आमदारांनी पक्षभेद विसरून संघर्ष करावा. विधिमंडळात आवाज उठवावा. 3 जुलै रोजी धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांच्या घरासमोर आपण पत्रचळवळ सुरू केली आहे. शनिवारी 6 जुलै रोजी कुंदगोळचे आमदार आर. एम. पाटील व धारवाडचे आमदार अरविंद बेल्लद यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. 7 जुलै रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कागवाडचे आमदार राजू पाटील, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील व चिकोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या घरांसमोर पत्रचळवळ करण्यात येणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले.
Home महत्वाची बातमी पंचमसाली समाजाला आरक्षणासाठी बसवजय मृत्युंजय स्वामीजींची पत्रचळवळ
पंचमसाली समाजाला आरक्षणासाठी बसवजय मृत्युंजय स्वामीजींची पत्रचळवळ
आमदारांच्या घरांसमोर चळवळीला प्रारंभ बेळगाव : पंचमसाली समाजाला 2ए आरक्षण मिळावे, यासाठीच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आता पंचमसाली समाजातील आमदारांच्या घरासमोर पत्रचळवळ सुरू करण्यात आली आहे. बुधवार दि. 3 जुलैपासून ही चळवळ सुरू झाल्याची माहिती कुडलसंगम येथील श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी दिली. शुक्रवारी महात्मा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समाजाचे नेते […]