अगरबत्ती प्रकल्पाबाबत घेतले गांभीर्याने

प्रकल्प सुरू झाल्याने समाधान : पण कायम सुरू ठेवण्याची मागणी बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मध्यंतरी तो बंद असल्यामुळे त्याबाबत माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले. तातडीने त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तो प्रकल्प सुरू केला. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र कायमस्वरुपी हा प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी […]

अगरबत्ती प्रकल्पाबाबत घेतले गांभीर्याने

प्रकल्प सुरू झाल्याने समाधान : पण कायम सुरू ठेवण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मध्यंतरी तो बंद असल्यामुळे त्याबाबत माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले. तातडीने त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तो प्रकल्प सुरू केला. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र कायमस्वरुपी हा प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी या परिसरातील फुल विक्रेत्यांतून होत आहे. दरम्यान, अगरबत्तीचा सुगंध कधी दरवळणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विक्री न झालेल्या व खराब झालेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने फुल मार्केटमध्येच शेड उभे करण्यात आले असून त्या ठिकाणी यंत्र आणून त्याचे उद्घाटन झाले. मात्र उद्घाटनानंतर हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. याबाबत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीतही नगरसेवकांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी हे स्वत: तेथे जाऊन अगरबत्ती उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. फुलांचा ढीग मोठ्या प्रमाणात पडत आहे. बऱ्याचवेळा फुलांची विक्री होत असल्यामुळे शेतकरी व विक्रेतेही त्या ठिकाणी फुले टाकत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होवू शकतो. याचबरोबर महानगरपालिकेचे मनुष्यबळही वाचू शकते. मात्र नियमित हा प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी या परिसरातील फुल विक्रेत्यांकडून होत आहे. मध्यंतरी हा प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.