पुन्हा ‘त्या’ खटल्याची सुनावणी लांबणीवर

बेळगाव : बेंगळूर येथील छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणी म. ए. समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी सोमवारी होती. मात्र साक्षीदार गैरहजर राहिल्याने तो खटला पुढे ढकलण्यात आला असून 19 जून रोजी पुढील सुनावणी […]

पुन्हा ‘त्या’ खटल्याची सुनावणी लांबणीवर

बेळगाव : बेंगळूर येथील छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणी म. ए. समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी सोमवारी होती. मात्र साक्षीदार गैरहजर राहिल्याने तो खटला पुढे ढकलण्यात आला असून 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.  धर्मवीर संभाजी चौक येथे बेंगळूरच्या त्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सीमाभागामध्येच त्याचे पडसाद उमटले होते. या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. जेएमएफसी तृतीय न्यायालयामध्ये सोमवारी 10 कार्यकर्त्यांच्या खटल्याची सुनावणी होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. प्रताप यादव, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.